ही बंगाली पाककृती मी इंटरनेटवर सर्फ करत असताना बघितली आणि माझ्या चवीनुसार थोडीफार बदलली. बंगालीमध्ये डीम म्हणजे अंड आणि ढोका म्हणजे ढोकळा. ही अंड्याच्या ढोकळ्याची ग्रेव्ही. पण असे असताना सुद्धा नुसता अंड्याचा ढोकळा पण खूप चविष्ट लागतो आणि नाश्त्याला छान लागतो.
ढोका
साहित्य
६ अंडी
१ छोटा कांदा
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ मिरच्या बारीक चिरून
१ चमचा आलं पेस्ट
३ चमचे दुध
चिमुटभर बेकिंग पावडर
मीठ
कृती- एका भांड्यात अंड फेसून घ्या
- त्यात बारीक चिरून कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं पेस्ट, बेकिंग पावडर, दुध आणि मीठ घालुन ढवळणे.
- तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण घालुन कुकर मध्ये शिट्टी न लावता उकडणे
- पूर्णपणे ढोकळा शिजल्यानंतर कुकरमधून काढून लाडेच ताटात काढणे.
- चौकोनी तुकडे करून वाढणे किंवा ग्रेव्हीसाठी बाजूला ठेवणे
ग्रेव्ही
साहित्य
२-३ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टोमेटो
१ चमचा मौव्हरी आणि जीरा
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी दही (इच्छेनुसार)
२ चमचा जीरा पूड
२ चमचा धने पूड
२ वाटी पाणी
१ चमचे साखर
१ चमचा तिखट
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- कांदा आणि टोमेटो वेगळे वेगळे मिक्सरमध्ये वाटून घेणे
- कढईमध्ये तेल गरम करून मौव्हरी आणि जीरा घालणे
- फोडणीझाल्यावर त्यात वाटलेला कांदा आणि साखर घालुन सारखे हलवत तेल वेगळे होईपर्यंत शिजवणे.
- त्यामध्ये वाटलेला टोमेटो, आलं आणि लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालणे. टोमेटो शिजेपर्यंत ढवळत शिजवावे
- तोपर्यंत एका वाटीमध्ये दही, जीरा पूड, धने पूड आणि तिखट एकत्र करणे
- टोमेटो शिजल्यावर कधी आचेवरून बाजूला काढून त्यात दह्याचे मिश्रण घालणे.
- व्यवस्तीथ हलवून पुन्हा मंद आचेवर ठेवणे.
- ग्रेव्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत सारखे हलवत, जरूर पडल्यास पाणी घालुन शिजवणे.
- डीमेर ढोका आणि मीठ घालुन एक उकळी काढणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे.
टीप
अंड्याच्या ढोकळ्यामध्ये टोमेटो बारीक चिरून घालता येईल पण मला अंड्याबरोबर टोमेटो बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नाही घातला.
६ अंड्यापासून अंदाजे २० ढोकळे तयार होतात
पहिल्यांदा जेंव्हा मी ही ग्रेव्ही केली होती तेंव्हा मी दही घालुन केलेली पण काल मी दही न घालता केली आणि मला ती जास्त छान लागली.