Jul 2007
05
पुदिन्याचा पराठा
मागच्या रविवारी मी जेंव्हा कटलेट बनवला तेंव्हा पूदिना चटणी बनवण्याचा बेत बनवला. मी तेंव्हा अजॉयला थोडासा पुदीना आनण्यास सांगीतल. पण त्यानी मोठी गड्डी आणली. मग काय इथे पुदिना फेस्टिवलच चालू झाला. त्यातूनच ह्या पदार्थाचा जन्म झालं.

साहित्य
४ चमचे पुदिना
१ चमचा कोथिंबीरीची पान
५ चमचे भरून गव्हाचे पीठ
१.५ चमचे बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा जीरा पुड
१/४ चमचा धने पुड
मीठ
तेल/तुप
कृती
- तेल सोडून सगळे साहित्य एकत्र करने
- त्यात २ चमचे तेल घालणे
- पाणी घालून पीठ नीट मळून घेणे
- ३० मिनिटे पीठ भिजायला बाजुला ठेवणे
- ३ घड्य घालून पराठे बनवाने
- तव्यावर भाजून लोणी, लोणचे आणि दह्याबरोबर वाढणे
कोथिंबीरीच्या पानांमुळे एक मस्त चव येते पण जर तुम्हाला पुन्दिना खुप आवडत असेल तर कोथिंबीरीची पान वगळली तरी चालतील
मी पराठे भाजताना तेल वापरते आणि अर्धे भाजून झाल्यावर त्याना थोडेसे तूप लावून भाजते. त्यामुळे तेल पराठ्यांमद्धे चांगले मुरते
0 comments:
Post a Comment