दाबेली स्टाईल बटाट्याचा पराठा
मी इंडियामधून जेंव्हा दाबेली मसाला घेऊन आले तेंव्हा पासून असे काहीतरी बनवण्याचे मनात होते. शेवटी मी आज हा पराठा बनवला
साहित्य
१० चमचे गव्हाचे पीठ
१ बटाटा
१/२ चमचा कच्ची दाबेली मसाला
१/४ चमचा तिखट
१/२ चमचा चिंच
१ चमचा शेंगदाणा कुट
१/२ चमचे मनुके
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- गव्हाचे पीठ, मीठ आणि एक चमचाभर तेल एकत्र करणे.
- पाणी घालुन पीठ भिजवणे व भिजायला बाजूला ठेवून देणे.
- कुकरमध्ये बटाटे उकडून घेणे व थंड होउ देणे.
- चिंच २ चमचाभर पाण्यात भिजवून ठेवणे
- बटाटे किसून त्यात दाबेली मसाला, तिखट, शेंगदाणा कुट, चिंचेचा कोळ आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- त्यात कोथिंबीर आणि मनुके बारीक चिरून आणि मनुके घालणे.
- गव्हाच्या पीठाचे आणि बटाट्याच्या मिश्रणाचे ५ गोळे बनवणे.
- गव्हाच्या पिठाच्या गोळ्याची वाटी बनवून त्यात बटाट्याचा गोळा घालुन बंद करणे
- पराठा लारून तव्यावर दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर भाजून घेणे.
टीप
बटाटे एकदम व्यवस्थित एकदम नरम होईपर्यंत उकडणे महत्वाचे आहे ज्यामुळे मिश्रण एकजीव बनेल
0 comments:
Post a Comment