मटार पनीर
मला पनीर फार आवडते त्यापैकी हि माझी एक आवडती कृती.
साहित्य
२०० ग्राम पनीर
१ वाटी मटार
४ टोमाटो
२ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आलं पेस्ट
१/२ चमचा हळद
१.५ चमचा तिखट
१.५ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- कढईत पनीर मध्यम आचेवर तळून घेणे.
- कांदे पण गुलाबी होईपर्यंत भाजून बाजूला ठेवणे.
- मटार पाण्यात शिजवून बाजूला ठेवणे.
- मिक्सरमध्ये टोमाटो, आणि शिजवलेला कांदा घालुन वाटून घेणे.
- कढईत तेल घालुन त्यात वाटलेले मिश्रण घालणे.
- त्यात हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, आले आणि लसूण पेस्ट घालुन चांगले ढवळणे.
- मिश्रण ५-६ मिनिट शिजवणे आणि लागल्यास थोडे पाणी घालणे.
- त्यात पनीरचे तुकडे, मटार आणि मीठ घालुन पुन्हा २-३ मिनिट शिजवणे. चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे.
टीप
पनीर मऊ करण्यासाठी, तळलेले पनीर गरम पाण्यात घालुन पनीर खाली जाऊ देणे आणि मग त्याचा वापर करणे.
0 comments:
Post a Comment