कॉर्न आप्पे
अजॉय परत आल्यामुळे काहीतरी विशेष बनवण्यासाठी हा आईचा पदार्थ बनवला.
साहित्य
३ वाटी कॉर्न
१.५ वाटी रवा
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ वाटी कोथिंबीर
१/४ वाटी खाण्याचा सोडा
मीठ
तेल
कृती
- कॉर्न आणि हिरव्या मिरच्या एकत्र बारीक वाटणे.
- त्यात रवा, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालुन ढवळणे.
- खाण्याचा सोडा आणि थोडे पाणी घालुन पेस्ट बनवणे.
- आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावणे.
- कॉर्नचे मिश्रण घालुन मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर भाजणे.
टीप
पेस्ट इडलीच्या पिठासारखी असली पाहिजे म्हणजे आप्पे चांगले होतील
0 comments:
Post a Comment