बटर चिकन
हॉटेलमधील एक अतिशय आवडती डीश. साधारण महिन्यापूर्वी केलेला पण फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद उरली नव्हती त्यामुळे आज पुन्हा हि डीश केल्यावर इथे देत आहे
साहित्य
३०० ग्राम बोनलेस चिकन
२ टोमाटो
१ कांदा
१.५ चमचा तिखट
२ चमचा धने पूड
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा जीरा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
चिमुटभर लाल रंग
१/२ चमचा साखर
१/४ चमचा टोमाटो सॉस
१ वाटी क्रीम
४ चमचा लोणी
मीठ
तेल
कृती
- चिकनचे तुकडे करणे व त्यांना मीठ, तिखट, धने पूड, १/४ चमचा लसूण पेस्ट आणि १/४ चमचा आले पेस्ट लावणे.
- कढईत तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे ४-५ मिनिट परतणे.
- त्याच तेलात जीऱ्याची फोडणी करणे व त्यात बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, उरलेली लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने पूड घालणे.
- त्यात तेल घालुन उकळवणे.
- त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन ते पूर्ण शिजेपर्यंत उकळवणे व नंतर बारीक वाटणे.
- कढईत लोणी वितळवणे व त्यात वाटण व मीठ घालणे.
- त्यात १/२ वाटी पाणी, लाल रंग घालुन उकळवणे.
- त्यात साखर, सॉस आणि परतलेले चिकनचे तुकडे घालुन उकळवणे.
- आच मंद करून त्यात क्रीम घालुन अजून ४-५ मिनिट शिजवणे.
टीप
क्रीम घालताना आच धीमी करायला विसरू नये नाही तर मिश्रण व्यवस्थित एकत्र होणार नाही
0 comments:
Post a Comment