जेलीसहित फ्रुट सॅलेड
अगदी लहान होते तेंव्हापासून मला फ्रुट सॅलेड फार आवडायचे. आज बाजारात भरपूर फळे बघून मी फ्रुट सॅलेड बनवायचा विचार केला.
साहित्य
१ सफरचंद
१ चिक्कू
२ मोसंबी
२ संत्री
१/२ वाटी द्राक्षा
२ केळी
१/२ डाळिंब
५-६ स्ट्रॉबेरी
१ पाकीट कस्टर्ड पूड
२ पाकीट जेली मिक्स
१/२ लिटर दुध
२ चमचे साखर
कृती
- ९००मिलीलीटर पाणी उकळवून त्यात जेली मिक्स घालणे व जेली भांड्यात लावणे.
- कस्टर्ड पूड थोड्याश्या दुधात घालुन पेस्ट बनवणे.
- उरलेल्या दुधात साखर घालुन उकळवणे.
- त्यात कस्टर्ड पेस्ट घालुन ३-४ मिनिट उकळवणे व बाजूला ठेवणे.
- जेली आणि कस्टर्ड फ्रीजमध्ये थंड करणे.
- सफरचंद, चिक्कू, केळी, मोसंबी, संत्री बिया आणि साले काढून बारीक चिरणे.
- त्यात द्राक्षा एकत्र करणे.
- फ्रुट सॅलेड देताना त्यात सगळ्यात खाली फळांचा थर देणे व त्यावर जेलीचे तुकडे, कस्टर्ड घालणे.
- वरून स्ट्रॉबेरी आणि डाळिंब घालुन खायला देणे.
टीप
मी विकीफिल्ड जेली मिक्स आणि कस्टर्ड पूड वापरले.
मी रासबेरी, केळी आणि लिंबाची चव असलेले जेली वापरले पण त्यात कुठलीही जेली घालता येईल
पाहिजे असल्यास कस्टर्डच्या वर आईसक्रीम पण घालुन देता येईल
ह्यात अननस घालता येईल, तसेच न मिळालेली फळेपण घालता येतील हे अगदी लीचीसारख्या फक्त एका फळाबरोबरपण मस्त लागते
0 comments:
Post a Comment