Jan 2008
09
फ्लॉवर चटपटा
मी लहान असता डीडी मराठीवर एकदा फ्लॉवर तुरे नावाचा प्रकार बघितलेला. आता मला ते कसे बनवायचे काही आठवत नाही पण बहुदा ते असेच काहीसे असावेत.
साहित्य
४ वाटी फ्लॉवर तुकडे
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
मीठ
तेल
कृती
- फ्लॉवरचे दोन वाटी तुकडे, तिखट, मीठ, हळद आणि लिंबाचा रस एकत्र मिसळणे
- उरलेल्या फ्लॉवरच्या तुकड्यांना मीठ लावणे
- कढईत तेल गरम करून मीठ लावलेले फ्लॉवर तुकडे आधी तळणे आणि नंतर मसाले लावलेले तुकडे तळणे.
- सर्व तुकडे एकत्र करून खायला देणे.
टीप
वरून चाट मसाला घालुन देता येईल
आधी मिठाचे तुकडे तळल्यामुळे फ्लॉवरचा रंग खराब होत नाही व त्यात मसाल्याची चव मिसळली जात नाही
0 comments:
Post a Comment