चिकन लॉलीपॉप
मी हे खूप दिवसांआधी बनवलेले पण कामामध्ये विसरून गेले पोस्ट करायला. एकदम सोप्पी आणि चविष्ठ चिकनची डीश
साहित्य
८ चिकनचे लॉलीपॉप
१/२ वाटी मैदा
१/४ वाटी कॉर्न फ्लौर
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१ अंडे
चिमुटभर खाण्याचा लाल रंग
मीठ
तेल
कृती
- लॉलीपॉपला मीठ, लसूण पेस्ट, आले पेस्ट लावून ५ मिनिट बाजूला ठेवणे.
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसाला, लाल रंग, मैदा आणि कॉर्न फ्लौर घालुन चांगले एकत्र करणे
- त्यात अंडे घालुन एकत्र करणे व १ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
- तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर लॉलीपॉप तळणे
टीप
ह्यात कडीपत्तापण घालुन वेगळी चव आणता येईल
हाडाची बाजू अल्युमिनियमच्या फॉइल लावून देता येईल पण माझ्याकडची फॉइल संपल्यामुळे मी वापरली नाही
0 comments:
Post a Comment