Jun 2008
04
रसगुल्ला
पहिल्यांदा जेव्हा मी रसगुल्ले बनवले तेंव्हा ते फार काही चांगले झाले नव्हते. थोडी माहिती गोळा केल्यावर मला काय चुकीचे होत होते ते कळले आणि ह्यावेळी मस्त झालेले.

साहित्य
१ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
२.५ वाटी साखर
२ थेंब गुलाबाचा इसेन्स
कृती
- दुध उकळवून त्यात चमचाभर पाण्यात व्हिनेगर एकत्र करून ढवळत घालणे.
- पनीरच गोळा वेगळा झाला असेल, लगेच ते चाळणीत पंचा घालुन त्यावर ओतणे.
- त्यात थंड पाणी घालुन स्वत्च धुणे.
- पंचा घट्ट बांधून पनीरमधले पाणी काढून टाकणे.
- कुकरमध्ये साखर आणि ६ वाटी पाणी घालुन उकळवत ठेवणे.
- पाणी उकळत असताना बाजूला पानेर २-३ मिनिट चांगले मळून मऊसर मळणे व त्याचे १० छोटे गोळे बनवणे
- पाणी उकळल्यावर त्यात गोळे टाकून ५ मिनिट उकळवणे.
- कुकरला बंद करून शिट्टीशिवाय अजून ५ मिनिट उकळवणे.
- कुकरचे झाकण उघडून त्यात १/४ वाटी पाणी घालणे व झाकानाशिवाय ५ मिनिट उकळवणे.
- मिश्रण थंड करून त्यात गुलाबाचा इसेन्स घालणे व थंड करून मग खायला देणे.
टीप
पनीर व्यवस्थित मळले गेले असेल तर ते साखरेच्या पाण्यात घालताच तरंगायला लागतील.
पनीर गरम असतानाच मळणे म्हणजे गोळे एकदम मऊसर होतील
0 comments:
Post a Comment