भरलेली भेंडी फ्राय
बरेच दिवसांपासून भेंडी फ्राय करायला सांगत होता. त्यानी कडीपत्त्याऎवजी आज भेंडी आणली. लगेच मला कळले की त्याला भेंडी फ्राय किती जास्त खावास वाटतंय. मी लगेच काहीतरी बनवण्याचे ठरवले.
साहित्य
१/४ किलो भेंडी
१ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- भेंडी धुवून पुसून घेणे.
- देठ कापून प्रत्येक भेंडीला एक चीर देणे व मीठ लावून बाजूला ठेवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
- त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
- त्यात लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पूड घालुन एकत्र ढवळणे.
- त्यात टोमाटो किसून घालणे व ४-५ मिनिट एकत्र भाजणे व बाजूला ठेवणे.
- थोडे थोडे मिश्रण प्रत्येक भेंडीत भरणे.
- कढईत तेल गरम करून त्यात भेंडी सोडून तळणे.
टीप
प्रत्येक भेंडीला पूर्ण चीर देण्याऎवजी दोन्ही बाजूनी थोडा भाग न चिरता सोडणे म्हणजे तळताना पूर्ण भेंडी उघडणार नाही.
तळताना भेंडी पहिल्यांदा स्टफिंग नसलेल्या बाजूला खाली सोडणे व पूर्णपणे भाजणे, भेंडीला उलटे करून एक मिनिट तळणे व लगेच बाहेर काढणे.
0 comments:
Post a Comment