फिश कबाब


मागच्या रविवारी मी संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी बनवायचे म्हणून हे कबाब बनवलेले. एकदम लवकर आणि छान झालेले.

फिश कबाब
साहित्य
२ माश्यांचे तुकडे (साधारण १८० ग्राम काट्या विना)
१ कांदा
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
१/४ चमचा तिखट
१ हिरवी मिरची
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१/४ चमचा लवंग पूड
१/२ चमचे धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ वाती कोथिम्बिर
४-५ छोट्या ढब्बू मिरच्या
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
 • माश्याचे तुकडे कुस्करून त्यात मिरे पूड, तिखट, दालचिनी पूड, लवंग पूड, धने पूड, गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करणे
 • त्यात बारीक चिरून कांदे, ढब्बू मिरच्या, हिरवी मिरची आणि कोथिम्बिर घालणे
 • त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकत्र करणे व कबाबचे गोळे बनवणे
 • तवा गरम करून त्यावर तेल व कबाब घालून सर्व बाजूनी गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतणे

टीप
मी ह्यावेळी माशे मायक्रोवेव्हच्या ऑटो डिफ़्रोस्ट केलेले आणि ते एकदम ५ मिनिटात शलेले. नेहमीसारखे १५ मिनिट वाट बघत बसावे लागले नाही ते सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही खूप भुकेले होतो.
हे नाश्त्यासाठी, स्टार्टरम्हणून, साईड डिशम्हणून किंवा पावात घालून पण खायला देत येतिल.

हराभरा कबाब


मी हे कबाब शनिवारी बनवलेले आणि माझ्या मते आधीच्या पेक्षा हे जास्त छान होते. बर्याच जणांनी ह्याची कृती मागितली म्हणून मी इथे देत आहे.

हराभरा कबाब
साहित्य
६ वाटी मटार
२ मोठे बटाटे
१.५ वाटी पनीर
३ मुठभर पालकाची पाने
२ मुठभर कोथिंबीर
१ मुठभर पुदिना
३ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
२ चमचे चाट मसाला
१ चमचा आमचूर पूड
१/४ वाटी ब्रेडक्रम्बस
१ वाटी काजू
मीठ
तेल

कृती
 • बटाटे कुकरमध्ये उकडून थंड करणे. साले काढून किसून एका मोठ्या भांड्यात घालणे.
 • ४ वाटी मटार मायक्रोवेव्ह मध्ये ३ मिनिट शिजवून घेणे.
 • शिजलेले मटार आणि पालक मिक्सरमध्ये घालून बारीक वाटणे.
 • त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून आणखी वाटणे व बटाटे घातलेल्या भांड्यात ओतणे.
 • त्यात किसलेले पनीर, चाट मसाला, आमचूर पूड आणि ब्रेडक्रम्ब्स घालून एकत्र करणे.
 • उरलेले २ वाटी मटार मायक्रोवेव्ह करून मिश्रण घालून एकत्र करणे.
 • मिश्रणाचे छोटे गोळे बनवून त्यावर काजू दाबून लावणे. मध्यम आचेवर तेल घालून तव्यावर दोन्हीबाजूनी गडद लाल होईपर्यंत भाजणे

टीप
मिश्रण लगेच वापरल्यावर थोडे चिकट वाटत होते पण मी उरलेले मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले व दुसऱ्यादिवशी लगेच गोळे करून तव्यावर घातले. तेंव्हा ते जास्त चिकटत नव्हते आणि कबाब भाजायला सोप्पे झाले.
हि कृती मी सानेहामिच्या ४ जणांच्या हिशोबाऐवजी १२ लोकांच्या हिशोबानी स्तर्तार म्हणून केलेली
मी ह्यात ताजे पनीर बनवून वापरले. १ लिटर २% रिड्युस्ड फट दुध उकळवून त्यात एका लिंबाचा रस घालून ढवळणे. दुध फाटल्यावर ते पंच्यावर ओतून त्यातले पाणी काढून तयार झालेले पनीर हातानी कुस्करून मिश्रांत घातले.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP