हराभरा कबाब
मी हे कबाब शनिवारी बनवलेले आणि माझ्या मते आधीच्या पेक्षा हे जास्त छान होते. बर्याच जणांनी ह्याची कृती मागितली म्हणून मी इथे देत आहे.
साहित्य
६ वाटी मटार
२ मोठे बटाटे
१.५ वाटी पनीर
३ मुठभर पालकाची पाने
२ मुठभर कोथिंबीर
१ मुठभर पुदिना
३ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
२ चमचे चाट मसाला
१ चमचा आमचूर पूड
१/४ वाटी ब्रेडक्रम्बस
१ वाटी काजू
मीठ
तेल
कृती
- बटाटे कुकरमध्ये उकडून थंड करणे. साले काढून किसून एका मोठ्या भांड्यात घालणे.
- ४ वाटी मटार मायक्रोवेव्ह मध्ये ३ मिनिट शिजवून घेणे.
- शिजलेले मटार आणि पालक मिक्सरमध्ये घालून बारीक वाटणे.
- त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून आणखी वाटणे व बटाटे घातलेल्या भांड्यात ओतणे.
- त्यात किसलेले पनीर, चाट मसाला, आमचूर पूड आणि ब्रेडक्रम्ब्स घालून एकत्र करणे.
- उरलेले २ वाटी मटार मायक्रोवेव्ह करून मिश्रण घालून एकत्र करणे.
- मिश्रणाचे छोटे गोळे बनवून त्यावर काजू दाबून लावणे. मध्यम आचेवर तेल घालून तव्यावर दोन्हीबाजूनी गडद लाल होईपर्यंत भाजणे
टीप
मिश्रण लगेच वापरल्यावर थोडे चिकट वाटत होते पण मी उरलेले मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले व दुसऱ्यादिवशी लगेच गोळे करून तव्यावर घातले. तेंव्हा ते जास्त चिकटत नव्हते आणि कबाब भाजायला सोप्पे झाले.
हि कृती मी सानेहामिच्या ४ जणांच्या हिशोबाऐवजी १२ लोकांच्या हिशोबानी स्तर्तार म्हणून केलेली
मी ह्यात ताजे पनीर बनवून वापरले. १ लिटर २% रिड्युस्ड फट दुध उकळवून त्यात एका लिंबाचा रस घालून ढवळणे. दुध फाटल्यावर ते पंच्यावर ओतून त्यातले पाणी काढून तयार झालेले पनीर हातानी कुस्करून मिश्रांत घातले.
0 comments:
Post a Comment