कोळंबी मसाला
कोळंबी हा माझा सगळ्यात जास्त आवडता प्रकार. पण मा जो कोळंबीचा मसाला बनवतात तो तर एकदमच जास्त आवडता, अगदी तळलेल्या कोळंबीपेक्षा सुद्धा.
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
२ कांदे
२ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
किसलेले खोबरे
मीठ
तेल
कृती
- कढईत तेल गरम करणे.
- त्यात कोळंबी घालुन १-२ मिनिट भाजून घेणे व बाजूला ठेवून देणे.
- त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा भाजणे.
- कांदा शिजल्यावर त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट आणि हळद घालुन पुन्हा भाजणे.
- त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालुन २-३ मिनिट शिजवणे.
- त्यात पाणी घालुन झाकणी लावून पूर्णपणे शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
- मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
- कढईत वाटलेले मिश्रण आणि एक वाटी पाणी घालणे. त्यात कोळंबी घालुन पूर्णपणे शिजवणे.
- त्यात किसलेले खोबरे आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
टीप
मां मिक्सरमध्ये वाटून नाही घेत व त्याऎवजी टोमाटो पूर्ण शिजवून घेते पण मला वाटलेली ग्रेव्ही जास्त बरी वाटते त्यामुळे कांद्याची चवपण त्यात येते.
0 comments:
Post a Comment