अंडी मसाला
हि अंड्याची एकदम चविष्ठ कृती मला मिळाली. हि मी एका पुस्तकात वाचली आणि करून बघण्याचे ठरवले. आधी एकदा केलेले पण ती इतकी सुंदर नव्हती झाली. आज एकदम मस्त झाली तर कृती देत आहे
साहित्य
३ अंडी
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आले लसूण पेस्ट
२ चमचे कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
- त्यात लसूण आले पेस्ट, तिखट आणि गरम मसाला घालुन अजून परतणे.
- त्यात टोमाटो घालुन तेल सुटेपर्यंत शिजवणे.
- तव्याला तेल लावून त्यावर मसाल्याचे मिश्रण पातळ पसरवणे.
- अंडी फोडून मसाल्यावर सोडणे.
- झाकण ठेवून मंद आचेवर अंडी घट्ट होई पर्यंत शिजवणे व वरून कोथिंबीर घालुन खायला देणे.
टीप
मसाला शिजलेला असल्यानी तो सध्या तव्यावर घातला तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे नॉनस्टिक तवा वापरणे व एकदम मंद आचेवर शिजवणे
हा ब्रेड किंवा पराठे/फुलके बरोबर पण देता येईल
0 comments:
Post a Comment