आंब्याचा शिरा
आज गोव्यावरून आल्यावर मला काहीतरी सोप्पे आणि चविष्ठ बनवायचे मनात होते. बऱ्याच वेळा हॉटेलचे खाणे खाऊन कंटाळा आल्यावर काहीतरी साधे खायचे मनात असल्यानी मी हि डीश बनवली
साहित्य
१ वाटी रवा
१.५ वाटी आंब्याचा रस
१ वाटी दुध
१.५ वाटी पाणी
१/२ वाटी साखर
४-५ बदाम
चिमुटभर केशर
तूप
कृती
- कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे.
- दुसऱ्या भांड्यात पाणी आणि दुध एकत्र करून उकळवणे व रव्यात घालणे.
- रवा शिजून जाड झाल्यावर त्यात साखर आणि आंबा रस घालणे व अजून थोडा वेळ शिजवणे.
- वरून केशर आणि बदाम घालुन खायला देणे.
टीप
मी फक्त अर्धा वाटी साखर वापरली कारण आंब्याचा रसात सुद्धा साखर होती
मी आजकाल आंब्याच्या छोट्या तुकाद्यासकट मिळणारा रस वापरला त्यामुळे अजून छान चव आली
0 comments:
Post a Comment