चिली पनीर
मला चायनीज फार आवडते आणि बरेच दिवस झाले मी ते खाऊन. थोड्या दिवसांपूर्वी आम्ही खालेल पण ते इतका छान नव्हता त्यामुळे ते न मोजलेलच बर. त्यामुळे काल मी स्वतःच करून बघायचा ठरवलं. ह्या आधी केलेलं चांगल झालेलं किंतु सगळ्यात चांगला नव्हत. आज एकदम छान झालेलं असल्यानी त्याची कृती देत आहे
साहित्य
४०० ग्राम पनीर
१ कांदा
६ मिरच्या
१५ लसूण पाकळ्या
चिमुटभर मिरे पूड
२ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा टोमाटो सॉस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२-३ कांद्याच्या पाती
मीठ
तेल
कृती
- पनीर चौकोनी कापून त्याला कढईत गरम तेलावर गुलाबी रंगावर भाजून घेणे.
- त्याच तेलात कांदा भाजणे.
- त्यात मिरच्या आणि लसूण कापून घालणे व भाजणे.
- मिरे पूड, सोया सॉस घालुन थोड्यावेळ ढवळणे
- आता त्यात भाजलेले पनीर आणि टोमाटो सॉस घालुन २-३ मिनिट शिजवणे.
- कॉर्न फ्लौर एका वाटी पाण्यात एकत्र करून शिजणाऱ्या पनीरमध्ये घालणे
- लागल्यास अजून थोडे पाणी घालुन झाकणी लावून ३ मिनिट शिजवणे.
- वरून काड्याची पात चिरून घालणे व वाढणे.
टीप
मी मिरच्या उभ्या चिरून घातल्या त्यामुळे एकदम हॉटेलच्या डीशसारखे दिसते
पनीर भाजताना त्याला हलका गुलाबी रंग आला की लगेच बाहेर काढणे, जास्त भाजल्यानी ते सुकून तडतडीत होण्याची शक्यता असते
स्टारटर सारखे वापरायचे असेल तर थोडे कमी पाणी वापरणे म्हणजे सुके होईल
0 comments:
Post a Comment