व्हेज फ्राईड राइस
मला हक्क नूडल्स आवडतात पण मला अजून हॉटेलसारख्या बनवायला जमल नाहीये त्यामुळे मी बऱ्याच वेळा फ्राईड राइस बनवते
साहित्य
२ वाटी तांदूळ
१ कांदा
१ वाटी कोबी
१/२ वाटी गाजर
१/२ वाटी मटार
चिमुटभर मिरे पूड
मीठ
तेल
कृती
- भात शिजवून बाजूला ठेवणे.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदा, उभे चिरलेले गाजर घालुन परतणे.
- त्यात चिरलेला कोबी घालुन परतणे.
- त्यात मटार, मिरे पूड आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
- शिजवलेला भात घालुन परतणे व २-३ मिनिट शिजवणे.
टीप
सगळ्यात पहिल्यांदा गाजर घालणे म्हणजे ते शिजायला वेळ मिळतो.
0 comments:
Post a Comment