तळलेले मोदक
आज मी पुरण पोळी बनवण्याचे ठरवले पण पोळीच्या कडांना पुरण पोचले नाही. २-३ वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी मी पुरण पोळीच्याऎवजी मोदक केले.
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
१/२ वाटी गुळ
४ चमचेभरून गव्हाचे पीठ
२ चमचाभरून मैदा
मीठ
तेल
कृती
- डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे व त्यातले पाणी काढून टाकणे.
- एका कढईत शिजलेली डाळ आणि गुळ घालुन ५-६ मिनिट शिजवणे.
- गव्हाचे पीठ, मैदा आणि एक चमचा गरम तेल एकत्र करून पीठ भिजवणे. अर्धा तास बाजूला ठेवून देणे.
- पीठ्चे छोटे गोळे पुरीच्या आकाराचे लाटणे.
- प्रत्येक पुरीवर पुरण पसरवून निऱ्या काढून मोदक बंद करणे.
- तेलात मध्यम आचेवर मोदक तळून घेणे.
टीप
हे मोदक पुराणाचे असल्यानी ते २-३ दिवस चांगले राहतात.
मोदक जिथे बंद करतो ती बाजू पण चांगली भाजणे अथवा तिथे कच्चे राहण्याची संभावना जास्त आहे.
0 comments:
Post a Comment