शेंगदाणा लाडू
लाडूमध्ये मला फार कमी प्रकार आहेत जे आवडतात पण हा सगळ्यात जास्त आवडीचा लाडू. आईला विचारून मी हा लाडू बनवला आणि सगळ्यात सोपा हा लाडू इथे देत आहे.
साहित्य
३ वाटी शेंगदाणा
१/२ वाटी गुळ
कृती
- कढईत शेंगदाणे भाजून घेणे.
- शेंगदाण्याची साल काढून मिक्सर मध्ये बारीक पूड करणे.
- त्यात चिरलेला गुळ घालुन पुन्हा वाटणे.
- लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.
टीप
शेंगण्याची साल काढण्याचा मला फार कंटाळा येतो त्यामुळे मी सालासकटच शेंगदाणे वाटते, चव फार काही बदलत नाही
रेसिपी सोपी आणि लहान मुलांच्या एकदम आवडीची.
शेंगदाणे एका कापडी पिशवीत टाकून जमिनीवर आपटायचे. म्हणजे शेंगदाण्याचे साल निघून जातात.