उकडीचे मोदक
गणेश चतुर्थी असल्यानी मी मागच्या आठवड्यात मोदक बनवण्याचे ठरवलेले पण पुण्याला सरप्राईज देण्यासाठी गेल्यानी ते राहून गेले. पण म्हणून मी आज वेळ मिळताच लगेच मोदक बनवायला घेतले.
साहित्य
१ वाटी किसलेला नारळ
३/४ वाटी गुळ
१.५ वाटी पाणी
१ वाटी तांदुळाचे पीठ
मीठ
तेल
कृती
- कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे आणि गुळ घालणे.
- साधारण ५-७ मिनिटांनी गुळ विरघळून खोबर्याचे मिश्रण तयार होईल.
- एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तेल आणि मीठ घालणे.
- त्यात तांदुळाचे पीठ घालुन चांगले ढवळून घेणे.
- मिश्रण आचेवरून काढून मळणे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून ते पातळ लाटणे
- त्यावर चमचाभर मिश्रण घालुन निऱ्या काढून मोदक बंद करणे.
- भांड्यात पाणी उकळवणे व त्यावर दुसरे भांडे ठेवणे. भांड्यावर पंचा पसरवून त्यावर सगळे मोदक ठेवणे. मोदकांना पंच्यानी झाकून ७-१० मिनिट शिजवणे.
टीप
खोबर्याचा हा पदार्थ जास्त टिकत नाही त्यामुळं एक - दोन दिवसात संपवणे.
0 comments:
Post a Comment