बीट आणि गाजराचे कटलेट
घरात असलेले भरपूर गाजर आणि बीट संपवायचे होते आणि काहीतरी चमचमीत खाण्याची हुक्की आल्यानी मी हे कटलेट बनवले.
साहित्य
२ बीट
६ गाजर
२ ब्रेडचे तुकडे
१ कांदा
१ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१ चमचा आलं लसूण पेस्ट
ब्रेडक्रम्स किंवा बारीक रवा
तेल
मीठ
कृती
- गाजर आणि बीट किसून घेणे.
- कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे.
- कांदा शिजल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, तिखट घालुन ढवळणे.
- त्यात किसलेले गाजर आणि बीट घालुन मिश्रण शिजवणे.
- त्यात मीठ व ब्रेडच्या तुकड्यांचा चुरा करून घालुन ढवळणे व थंड होण्यासाठी ठेवणे.
- मिश्रणाचे लांबट गोळे करून रवा किंवा ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तव्यावर थोडेसे तेल घालुन भाजणे.
टीप
कटलेटमध्ये बटाटे किंवा घेवडा पण घालता येईल
0 comments:
Post a Comment