व्हेज स्प्रिंग रोल
हि पाककृती मी मला लग्नात मिळालेल्या एका पुस्तकातून घेतली आहे. पुस्तकाच नाव आहे 'हमाखास पाकसिद्धी'
साहित्य
५ चमचाभरून मैदा
१ अंडे
३ गाजर
१ कोबी
२ कांदे
१ चमचा सोया सॉस
१/२ चमचा मिरे पूड
मीठ
तेल
कृती
- मैदा, अंडे, मीठ आणि पाणी एकत्र करून पातळ भिजवणे.
- नॉनस्टिक तव्यावर पातळ डोसे बनवणे.
- हे सगळे डोसे एकावर एक कॉर्न फ्लॉवर पसरवून ठेवणे.
- गाजर, कांदा आणि कोबी बारीक चिरणे.
- कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले गाजर, कोबी आणि कांदा घालुन सारखे परतत अर्धवट शिजवणे.
- त्यात सोया सॉस, मिरे पूड आणि मीठ घालुन एकत्र करून ढवळणे.
- अर्धा चमचा मैदा आणि थोडे पाणी एकत्र करून रोल बंद करण्यासाठी पेस्ट बनवणे.
- प्रत्येक डोश्यावर आधी बनवलेली भाजी घालुन रोल करणे व मैद्याच्या पेस्टनी बंद करणे.
- कढईत तेल घालुन रोल भाजणे.
टीप
डोसे एकदम पातळ बनवले पाहिजेत म्हणजे रोल एकदम कुरकुरीत होतील
छोटे छोटे डोसे बनवले तर स्प्रिंग रोल कापावे नाही लागणार व मिश्रण बाहेर येण्याचा संभाव नाही येणार.
0 comments:
Post a Comment