Sep 2007
05
नटी राईस
एका वाढदिवसाला ताज बंगलारूमध्ये मी नटी राईस खालेला. एकदम चविष्ठ. अजॉय आणि मला दोघानाही खूप लगेच आवडला. खातानाच मी घरी कसा बनवायचा विचार करायला चालू केलेला आणि पहिल्या प्रयत्नातच तो एकदम तसाच्या तसा बनलेला. एकदम सोपा आणि सुंदर पदार्थ.

साहित्य
२ वाटी भात
४ चमचे शिजवलेले कॉर्नचे दाणे
२ चमचे शेंगदाणे
२ चमचे काजू
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा मनुका
१/२ चमचा जीरा
२ चमचे तूप
मीठ
कृती
- कढईत तूप गरम करून त्यात जिरे फोडणी करणे.
- त्यात काजू, शेंगदाणे आणि मनुके घालणे.
- जेंव्हा काजू गुलाबी झाले की त्यात हिरव्या मिरच्या घालणे.
- तयार भात, कॉर्नचे दाणे आणि मीठ घालुन ढवळणे.
- ३-५ मिनिट वाफ काढून वाढणे.
टीप
फोडणीत ४-५ कडीपत्याची पानं घालता येतील
बासमती किंव्हा कुठलाही मोठ्या दाण्याचा भात वापरला तर भात खूप सुंदर होतो.
0 comments:
Post a Comment