आप्पे आणि खोबऱ्याची चटणी
अगदी लहान असल्यापासून घरात सगळ्यांना आप्पे फार आवडायचे. माहिती नाही मी आधी का नाही बनवलेत पण आज पहिल्यांदा करून बघितले आणि एकदम मस्त झालेत. आईला खूप वेळा फोन करून विचारावे लागले पण सगळे सार्थक झाले
आप्पे
साहित्य
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा हरभरा डाळ
३ वाटी इडली रवा
मीठ
कृती
- हरभरा डाळ आणि उडीद डाळ एकत्र १२ तास पाण्यात भिजवणे.
- इडली रवा सुद्धा १२ तास भिजवणे.
- १२ तासांनी डाळीतील पाणी काढून बारीक वाटणे.
- त्यात इडली रवा बारीक वाटून घालणे व चांगले एकत्र करणे. १२ तास आंबावण्यासाठी ठेवणे.
- सकाळी आप्पे पात्र गरम करून त्यात हे मिश्रण घालणे. दोन्ही बाजूनी गुलाबी होई पर्यंत मध्यम आचेवर भाजणे.
टीप
थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे भांड्याखाली पाणी गरम करून ठेवणे.
आप्पे बनवण्यासाठी आज काल नॉनस्टिक पात्र मिळते ते जास्त बरे पडते आणि त्यात एकदमच तेल लागत नाही.
खोबऱ्याची चटणी
साहित्य
१/२ खोबरे
मुठभर कोथिंबीर
४ चमचे चणा डाळ
१ हिरवी मिरची
१ चमचा साखर
मीठ
कृती
- खोबरे किसून घेणे.
- मिक्सरमध्ये किसलेले खोबरे, कोथिंबीर, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, साखर आणि मीठ घालुन एकत्र वाटणे. लागल्यास थोडे पाणी घालणे.
टीप
ह्या चटणीत चणा डाळ असल्यास घालणे पण वापरल्यास एकदम सुंदर चव येते
0 comments:
Post a Comment