पनीर पेशावरी
हा आमचा सी एम एच रोडवरच्या गोकुळ नावाच्या हॉटेलमधला एकदम आवडता पदार्थ. मी हि भाजी आता बऱ्याच वेळापासून बनवत आली आहे पण लग्नानंतर कधीच बनवली नव्हती असे लक्षात आल्यावर काल रात्रीच्या जेवणासाठी बनवली
साहित्य
२००ग्राम पनीर
२ कांदे
३ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- पनीर किसून घेणे. कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
- कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
- कांदे गुलाबी झाल्यावर त्यात आले आणि लसूण पेस्ट घालुन परतणे.
- त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड घालुन परतणे.
- टोमाटो घालुन ते शिजवणे व मिश्रण थंड करणे.
- मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्यात पाणी घालुन पुन्हा कढईत घालणे.
- त्यात पनीर आणि मीठ घालुन जाड होई पर्यंत शिजवणे.
टीप
ह्यात थोडी ढोबळी मिरची पण घालता येईल पण आम्हा दोघांना त्याची फारशी आवड नसल्यानी मी नाही वापरली
0 comments:
Post a Comment