माश्याचे रवा फ्राय
हा गोवा आणि कर्नाटकातील एकदम प्रसिद्ध प्रकार. खायला चविष्ठ करायला सोप्पा असा हा सगळ्यांनाच आवडेल.
साहित्य
४-५ माश्याचे तुकडे
२ चमचा तिखट
१ चमचा हळद
२ चमचे रवा
मीठ
तेल
कृती
- माश्याला मीठ लावून ५-१० मिनिट ठेवणे.
- त्यांना तिखट आणि हळद लावून अजून ५-१० मिनिट ठेवणे.
- तव्यावर थोडेसे तेल घालुन तवा गरम करणे.
- मासा रव्यात घोळवून तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत भाजणे
टीप
हा प्रकार कुठल्याही माश्याचा बनवता येईल अगदी कोळंबीचा सुद्धा. चव माश्यापारमाणे बदलते
0 comments:
Post a Comment