झटपट भरीत
ह्या प्रकारचे वांग्याचे भरीत माझे फार आवडीचे. करायला एकदम सोप्पे आणि चवीला उत्कृष्ठ.
साहित्य
१ मोठे वांगे
१/२ कांदा
४ चमचे दही
२ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
मीठ
कृती
- वांगे भाजून घेणे व त्याची साल काढणे.
- वांगे कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा, दही, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे.
- वरून कोथिंबीर बारीक चिरून घालणे व एकत्र करून खायला देणे.
टीप
बारीक चिरलेला कांदा पण ह्यात घालता येईल.
0 comments:
Post a Comment