केळ्याची पुरी
मी फ्रुट सॅलेडसाठी केळी आणली होती तेंव्हा ह्या पुऱ्या करून बघायच्या ठरवल्या. आईनी दिलेल्या एका पुस्तकात हि कृती होती आणि जर जेवणात नाविन्य आणण्याची हौस असेल तर हि पुरी नक्की करून बघणे.
साहित्य
३ छोटी केळी
१/२ वाटी पिठी साखर
गव्हाचे पीठ
तेल
कृती
- केळी कुस्करून त्यात साखर घालुन ती विरघळेपर्यंत एकत्र करणे.
- त्यात गव्हाचे पीठ घालुन तेल लावणे
- पुऱ्या लाटणे आणि मध्यम आचेवर तळणे.
टीप
पुऱ्या लाटताना मला असे वाटले की मी केळे आणि साखर ब्लेंडरमध्ये वाटायला पाहिजे होते, तो माझा ह्या नंतरचा प्रयोग असेल
पीठ बाहेर जास्त वेळ ठेवू नये नाही तर काळे होते
0 comments:
Post a Comment