पपई पराठा
अजॉयनी २ पपई आणलेल्या. त्या थोड्या कच्च्या होत्या आणि ५-६ दिवसांनंतर सुद्धा त्या पिकण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून मग मी त्याचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले त्यातील हा पहिला.
साहित्य
१ कच्ची पपई
२ चमचे साखर
१ चमचा तिखट
१० चमचे गव्हाचे पीठ
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
- पपईची साले काढून किसून कढईत ६-७ मिनिट शिजवणे.
- त्यात साखर आणि तिखट घालुन शिजेपर्यंत परतणे.
- मिश्रण थंड झाले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पीठ घालुन पराठ्यासाठी पीठ मळणे व अर्धा तास भिजवणे
- पराठे लाटून तव्यावर तेल किंवा तूप घालुन भाजणे.
टीप
हे पराठे गोड आहेत आणि तिखट थोडीशी चव देण्यापुरतीच वापरले आहे
0 comments:
Post a Comment