पपईची टिक्की
पराठा बनवल्यानंतर हा अजून एक प्रकार की ज्यांनी फ्रीजमध्ये उरलेली पपई संपेल
साहित्य
१ कच्ची पपई
१ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा साखर
४ चमचे बेसन
४ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल
कृती
- पपई किसून कढईत पाणी घालुन मध्यम आचेवर शिजवणे.
- साखर घालुन पूर्ण सुके पर्यंत शिजवणे.
- दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात आले पेस्ट, तिखट घालुन परतणे.
- त्यात शिजवलेली पपई, मीठ घालुन परतणे.
- मिश्रण थंड करून त्यात बेसन आणि कॉर्न फ्लौर मिसळणे व रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणे.
- सकाळी मिश्रणाच्या टिक्की बनवून तव्यावर भाजणे.
टीप
मिश्रण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानी चांगले घट्ट होते व टिक्की बनवायला सोप्पे जाते
टिक्कीला रव्यामध्ये अथवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून पण भाजत येईल व थोडी वेगळी चव देता येईल
0 comments:
Post a Comment