भेंडी फ्राय
इथे इंचीन बांबू नावाच्या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्ला. अजॉयची एकदम आवडीची डीश. मिलिंदच्या भेंडीप्रेमाला लक्षात घेता हे ओळखणं कठीण नाही की आम्हाला ह्या डीशची परिचय त्यानी करून दिला. तो इथे आमच्याकडे राहत असताना करून बघण्याचा बेत होता पण तो राहूनच गेला. आज शेवटी एकदा मुहूर्त आला एकंदर. पदार्थाची चव एकदम मस्त आली आणि बरेचदा करण्यासाठी उत्तम पाककृती मिळाली आहे.
साहित्य
५ वाटी भेंडी
४ चमचे मैदा
४ चमचे कॉर्न फ्लौर
१ कांदा
१ हिरवी मिरची
३ सुक्या मिरच्या
२ पाकळ्या लसूण
२.५ चमचे सोया सॉस
१/२ चमचे तिखट
१/४ चमचे लसुणाची पेस्ट
तेल
मीठ
कृती
- मैदा, कॉर्न फ्लौर, तिखट, लसुणाची पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
- त्यामध्ये पाणी घालुन भजीच्या पिठासारखे पीठ बनवणे.
- मुठभरून भेंडीचे तुकडे त्या पिठात घोळवून गरम तेलात टाकणे.
- सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम-मोठ्या आचेवर भाजणे. बाजूला एका टिश्यूवरती काढून ठेवणे. उरलेले भेंडीचे तुकडे पण असेच भाजून घेणे.
- कढईत दोन चमचे तेल गरम कडून त्यात बारीक उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लासुनाचे तुकडे टाकून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणे.
- त्यामध्ये सुक्या मिरच्या कुस्करून, सोया सॉस टाकून ढवळणे.
- फ्राय केलेले भेंडीचे तुकडे टाकून ढवळणे. लगेच खायला देणे.
टीप
जर पाहुण्यांसाठी हा पदार्थ करण्याचे ठरवले तर भेंडी फ्राय करून ठेवणे पण ऐनवेळीस सॉसमध्ये घोळवणे. भेंडीचा कुस्कुशीत आणि कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी उपयोग होईल.
0 comments:
Post a Comment