गार्लिक बटर कोळंबी सॅलेड
मला आज काल सॅलेड हा प्रकार खूप आवडायला लागलाय. इथे एक एकदम सोपा पण चविष्ठ अशी पाककृती देत आहे
साहित्य
८ मोठे कोळंबी
२ वाटी ब्रोकोली
२ वाटी घेवडा
१ वाटी मक्याचे दाणे
१ अॅव्होकाडो
३ वाटी आईसबर्ग लेट्युस
१ कांदा
१ वाटी ढोबळी मिरची
१/४ वाटी चेरी टोमेटो
६ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा ऑरीगॅनो
१/२ चमचा मिरे पूड
१ लिंबू
मोझारीला चीझ
मीठ चवीनुसार
लोणी
कृती
- तवा गरम करून त्यात ब्रोकोली आणि घेवडा लोण्याबरोबर भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
- त्याच तव्यावर आता ढोबळी मिरची उभी चिरून आणि थोडे लोणी घालुन भाजणे.
- ढोबळी मिरची शिजत आल्यावर उभा चिरलेला कांदा आणि मीठ घालुन गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे.
- घेवडा आणि ब्रोकोलीच्या भांड्यात हे भाजलेले कांदा आणि मिरची मिश्रण घालणे
- आता त्याच तव्यावर थोडे लोणी घालुन त्यात कोळंबी आणि बारीक चिरून लसूण घालुन मध्यम आचेवर कोळंबी पूर्णपणे शिजेपर्यंत भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
- मायक्रोवेव्हमध्ये मक्याचे दाणे २ मिनिट शिजवून घेणे व बाजूला ठेवणे
- लेट्युस चिरून दोन भांड्यात घालणे.
- घेवडा, कांदा, ढोबळी मिरची आणि ब्रोकोलीचे मिश्रण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
- अॅव्होकाडो चिरून अर्धा अर्धा दोन्ही भांड्यात घालणे.
- आता दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे कोळंबी-लसूण मिश्रण घालणे.
- टोमेटो आणि मक्याचे दाणेपण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
- मिरे पूड, ऑरीगॅनो आणि लिंबू रस दोन्ही भांड्यात घालणे.
- मोझारीला चीझ घालुन वाढणे
टीप
मी फक्त लिंबू रस सॅलेड ड्रेसिंगम्हणून वापरलं. रॅन्च किंव्हा दुसरा काही वापरावा लागला नाही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार दुसरा ड्रेसिंगपण वापरू शकतात. माझ्यामते लिंबूमुळे सॅलेडची चव एकदम खुलून आली.
कोळंबी सोडून मी बाकी सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर भाजल्या त्यामुळे त्या कुसकुशीत लागत होत्या. कोळंबी मी तव्यावर टाकताना तवा मोठ्या आचेवर होता पण तव्यावर घालताच आच मंद केली त्यामुळे ते नीट शिजले पण तरीही त्यांना एक ग्रील केल्यासारखी चव आली.
0 comments:
Post a Comment