गाऊकामोले
मी पहिल्यांदा चीपोटलेमध्ये हा पदार्थ खाल्ला. खाताक्षणी मला खूपच आवडला आणि मग मी त्याची पाककृती शोधली. अत्यंत चविष्ठ आणि "२ min"वाला पदार्थ
साहित्य
3 अॅव्होकाडो
२ कांदे बारीक चिरून
१ चमचा बारीक चिरून टोमेटो
१/४ चमचा हिरवी मिरची बारीक चिरून
१ लसूण
मुठभर कोथिंबीर
१ मोठे लिंबू
मीठ चवीनुसार
कृती
- अॅव्होकाडो चिरून भांड्यात घालणे
- त्यात कांदा, टोमेटो, हिरवी मिरची घालणे
- लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात मिसळणे.
- मीठ आणि लिंबू रस घालणे
- नीट एकजीव करून वाढणे
टीप
मी मिश्रण बनवताना अॅव्होकाडो थोडे थोडे मुरडून एकजीव बनवले पण तरीही त्याचे थोडे थोडे तुकडे लागतील असे ठेवले.
हे लगेच खाणे महत्वाचे आहे कारण अॅव्होकाडो त्यातल्या लोहाच्या प्रमाणामुळे काळे पडतात.
0 comments:
Post a Comment