खेकडा पुलाव
हल्ली आम्ही कोस्टकोमधून खेकडे आणायला चालू केले. सगळ्यात प्रथम जेंव्हा खेकडे घेऊन आलो तेंव्हा मी हा सगळे साहित्य अंदाजाने घालत घालत हा पुलाव बनवण्याचा प्रयत्न केला. एकदम मस्त झाला पदार्थ आणि इतका आवडीचा ठरला की आता आमच्या जेवणात तो बरेचदा दिसतो.
साहित्य
१.५ वाटी तांदूळ
३०० ग्राम खेकड्याचा गर
१ वाटी दही
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
मीठ
तूप
कृती
- दह्यामध्ये तिखट, मिरे पूड, धने पूड, जिरे पूड, दालचिनी पूड, लवंग पूड आणि मीठ घालणे.
- दह्यामध्ये खेकड्याचा गर घालुन नीट हलवून २ तास बाजूला ठेवणे.
- तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवणे
- पाणी गरम करून त्यात भिजलेले तांदूळ घालुन शिजवणे. भात होत आलं की आचेवरून काढून बाजूला ठेवणे.
- कधी मध्ये तूप गरम करून त्यात दही लावलेले खेकडे दह्यासकट घालुन मध्यम आचेवर ब्रावून रंग येईपर्यंत शिजवणे. खेकडे शिजतील आणि तूप बाजूला सुटेल.
- त्यामध्ये शिजवलेला भात आणि चावीपुरात मीठ घालुन हलक्या हाताने ढवळणे.
- १-२ मिनिट वाफ काढून रायत्याबरोबर वाढणे
टीप
इथे खूप मोठे खेकडे मिळतात. आम्ही एकंदर ४ पाय = १.५ पाउंड = ०.७ किलो होते. त्याचे कवच काढून त्यातून ३०० ग्राम गर आला. जर छोटे खेकडे असतील तर कावचासहित वापरता येतील.
खेकड्याचा गर काढण्यासाठी ते धुवून घेतल्यावर धार धार सुरीनी कवच कापले आणि अलगद पणे गर बाहेर काढला.
0 comments:
Post a Comment