Aug 2010
28
पनीर पॅटिस
आज सकाळी अजॉयनी काहीतरी नवीन आणि चमचमीत बनवायची फर्माईश केली. थोडावेळ विचार केल्यावर मी हा पदार्थ करण्याचे ठरवले. एकदम चविष्ठ आणि आम्ही तो ब्रंच म्हणूनपण खाला. :)
साहित्य
४ वाटी बारीक चिरलेले पनीर
४ बटाटे
३ चमचे कॉर्न फ्लौर
१ चमचा आलं
३ हिरव्या मिरच्या
५ लसूणाच्या पाकळ्या
१/४ चमचे हळद
मीठ
तेल
कृती
- बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
- मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि मिरच्या १/४ वाटी पाणी घालुन वाटून घेणे
- कढईत तेल गरम करून त्यात हळद आणि वरील वाटण घालुन २ मिनिट शिजवणे
- त्यात पनीर आणि मीठ घालुन पूर्णपणे शिजवणे.
- बटाट्याची सालं काढून ते कुस्करून घेणे.
- त्यात कॉर्न फ्लौर आणि मीठ घालुन मळून घेणे.
- त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्यांच्या दाबून वाटी बनवावी
- ह्या वाट्यांमध्ये चमचाभर पनीर घालुन ते बंद करणे. ते गोळे हलक्या हातानी दाबून पॅटिस बनवणे
- कढईत तेल गरम करून त्यात पॅटिस गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे
टीप
पॅटिस भाजताना तेल एकदम गरम पाहिजे नाहीतर बटाट्याचे कव्हर कढईला चिकटू शकते.
Hi Dear!!
Today I got ur blog while seaching for receipe site...
And its awesome..
I liked very muccchhh...
Keep it up !!!
@Vaishali
Thank you for kind words.