हरभरा कबाब
हॉटेलमध्ये मला हा सगळ्यात आवडणारा पदार्थ. नेहमी वाटायचं की कबाब बनवण्यासाठी काहीतरी खास मशीन लागेल पण अजॉयला पालक खायचा म्हणून मी तव्यावर हे करून बघितले. एकदम छान झालेले.
साहित्य
३ बटाटे
२ वाटी मटार
२ पालक गड्डी
१ वाटी कोथिंबीर
१/२ गड्डी पुदिना
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
३ लिंबू
२ चमचा कॉर्न फ्लॉवर
२ ब्रेडचे तुकडे
३ चमचा लोणी
काजू
मीठ
तेल
कृती
- २-३ वाटी पाणी उकळवणे व त्यात पालकाची पाने घालुन थोडा वेळ उकळवून पाणी काढून टाकणे.
- कांदा मिक्सरमध्ये वाटून घेणे.
- कढईत लोणी घालुन गरम करणे.
- त्यात कांद्याची पेस्ट घालुन गुलाबी होईपर्यंत शिजवणे.
- पालक मिक्सर मध्ये वाटून घेणे व कांद्यात घालणे व पाणी आटेपर्यंत शिजवणे व थंड करण्यासाठी ठेवून देणे.
- बटाटे व मटार उकडून घेणे.
- कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या वाटून घेणे व थंड केलेल्या पालक - कांदा पेस्ट मध्ये पेस्ट घालणे.
- बटाटे किसून त्यात घालणे.
- मटार थोडेसे ठेचून त्यात घालणे.
- लिंबू, कॉर्न फ्लॉवर, ब्रेडचे तुकडे आणि मीठ घालणे व चांगले मळणे.
- लिंबाच्या आकाराचे गोळे करून थोडेसे दाबून त्यावर काजू लावणे.
- तव्यावर थोडेसे तेल घालुन कबाब भाजणे व पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला देणे.
टीप
भाजलेल्या कबाबवर थोडासा चाट मसाला शिंपडलं तर आणखीन सुंदर चव येते.
0 comments:
Post a Comment