Showing posts with label कपकेक. Show all posts
Showing posts with label कपकेक. Show all posts

चॉकलेट कपकेक


एकादिवशी असच काहीतरी बेकिंग करायचा म्हणून केलेला हा प्रयोग. बरेच दिवसांपासून फ्रीजमध्ये असलेल्या बटर आयसिंगचा एकदम मस्त उपयोग आणि ते केक बरोबर एकदम छान लागले

चॉकलेट कपकेक
साहित्य
2 वाटी साखर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स
१ अंडे
१/२ वाटी तेल
१ वाटी दुध
१.७५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
१ चमचा बेकिंग पूड
१ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा मीठ
२ चमचे इन्स्टण्ट कॉफी

कृती
  • ओव्हन 3२५F/१६०C वर गरम करणे
  • अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटणे
  • त्यात तेल आणि दुध घालून मध्यम वेगात मिश्रण फेटून घेणे
  • मैदा, कोको पूड, बेकिंग पूड आणि बेकिंग सोडा २-३ वेळा चाळून घेणे
  • चाळलेले पीठ अंडी-तेल-दुधाच्या मिश्रणात घालून २ मिनिट कमी वेगावर फेटणे
  • १ वाटी पाणी आणि कॉफी एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट गरम करणे
  • कॉफी केकच्या मिश्रणात घालून मध्यम वेगात २ मिनिट फेटणे
  • कपकेकच्या भांड्यात १४ लायनर घालून त्यात ३/४ पातळीपर्यंत भरणे
  • ओव्हनमध्ये १८ मिनिट भाजणे.
  • केक कमीत कमी १ तास थंड होऊ देणे मग केकवर फ्रॉसटिंग आणि फिलिंग घालून केक खायला देणे

टीप
मी फिलिंग नाही वापरले पण चॉकलेट गनाश एकदम चांगले जाइल
मी आधी बनवलेले चॉकलेट बटरक्रीम फ्रॉसटिंगसाठी वापरले

रेड वेल्वेट कपकेक


आई बाबा इथे होते तेंव्हाच मी हे बनवलेले पण तेंव्हा जरा सुके झालेले आणि रंग पण बरोबर आलं नव्हता. आज बनवताना मी थोडा प्रमाण बदललं आणि आता ते एकदम सुंदर झालेत. मी त्यांना पांढरे चॉकलेट क्रीम चीजचे आईसिंग केलं

रेड वेल्वेट कपकेक
साहित्य
२.५ वाटी मैदा
१/४ चमचा कोको पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा मीठ
१.५ वाटी साखर
१ अंड
१.५ वाटी तेल
२ चमचे दही
१ चमचा पातळ लाल खाण्याचा रंग
१/४ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा व्हॅनिला ईसेन्स

कृती
  • ३५०F/१७५C वर ओव्हन गरम करणे
  • मैदा व कोको पूड चाळून भांड्यात घेणे.
  • त्यात बेकिंग सोडा, मीठ आणि साखर घालुन एकत्र करणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंड, तेल, लाल रंग, व्हॅनिला ईसेन्स आणि व्हिनेगर घालणे.
  • एका वाटीत दही घेऊन त्यात उरलेल्या मापाचे पाणी घालणे. चमच्यानी ढवळून अंड, तेल मिश्रणात घालणे
  • मिश्रण कमी वेगावर एकजीव होईपर्यंत फेटून घेणे.
  • त्यात मैदा-कोको पूडचे सर्व मिश्रण प्रत्येक वेळी एक वाटी भर घालुन एकजीव होई पर्यंत फेटून घेणे.
  • कपकेकच्या भांड्यात कागदी कप घालुन १२ कप मध्ये मिश्रण घालणे.
  • केक ३५०F/१७५C वर ओव्हनमध्ये २२ मिनिट भाजणे.

टीप
मी नेहमी साधारणतः ७०% केकचा भाजण्याचा वेळ झाला की त्याला वळवून ठेवते (ह्या केक साठी साधारणतः १५ मिनिट) त्यामुळे केके सगळ्याबाजुनी एकदम मस्त भाजला जातो.

लिंबू आणि खजुराचा कपकेक


हल्लीच मी फूड नेटवर्क बघायला चालू केला आणि तिथे काही कार्यक्रम चांगले असतात. त्यातील एक म्हणजे कपकेक वॉर्स. त्यात भाग घेणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्ती आणि त्यातून निर्माण होणारे कपकेक्स हे एकदम बघण्यासारखे असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी हा पदार्थ केला.

लिंबू आणि खजुराचा कपकेक
साहित्य
४ वाटी मैदा
३ वाटी खजूर
२ वाटी दुध
१ वाटी लोणी
२ वाटी क्रीम
१ वाटी आईसिंग शुगर
१.५ वाटी साखर
२ अंडी
२ लिंबू
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
मीठ

कृती
  • १ वाटी खजूर आणि दुध मिक्सरमध्ये वाटून बाजूला ठेवावेत
  • लोणी आणि साखर हॅन्ड मिक्सर वापरुन फेटणे.
  • त्यात अंडी घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत फेटणे
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घेणे
  • लोणी-साखर-अंडी ह्याच्या मिश्रणामध्ये ते आणि दुध-खजूर मिश्रण थोडे थोडे घालुन फेटणे.
  • आता त्यात उरलेले खजूर बारीक चिरून, एका लिंबूच साल किसून आणि त्याच लिंबूचा रस घालुन अलगद ढवळणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे
  • कपकेकच्या भांड्यांमध्ये कागदाचे केककव्हर घालून त्यात केकचे मिश्रण २/३ पर्यंत भरणे
  • केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर २५ मिनिटं भाजणे व नंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • एका भांड्यात क्रीम आणि आईसिंग शुगर एकत्र करणे.
  • हॅन्ड मिक्सर वापरुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • प्रत्येक केकवरती थोडे थोडे क्रीम चमच्याने घालणे किंवा पाईपिंग पिशवीत घालून सजवणे. त्यावर उरलेल्या लिंबूच साल किसून घालणे.

टीप
मी बटर पेपरचा कोन बनवून त्यांनी केक वर आईसिंग केला कारण माझ्याकडे पाईपिंग पिशवी नव्हती. चांगला मार्ग होता तो. थोड्या केक वर मी चमच्यानी पण आईसिंग लावलं.
क्रीम फेताण्यासाठी हॅन्ड मिक्सर फार उपयोगी पडतो. एकदम सोप, लवकर आणि खात्रीदायक आईसिंग बनत

मोल्टन लाव्हा केक


बरेच दिवसांपूर्वी मी ह्या केक विषयी वाचले होते आणि त्याचा कॉन्सेप्ट मला फार आवडला. मग मी ह्याची पाककृती शोधल्यावर कळले की हि सगळ्यात सोप्पी आणि पटकन तयार होणारी पाककृती आहे. पण माझ्याकडे ते बनवण्यासाठी रामेकिंस किंव्हा पेपर कप नसल्यानी बरेच दिवस केक बनवण्याचे मनातच राहून गेले. पण आज मी रामेकिंस विकत आणले आणि केक बनविले. एकदम हीट ठरलाय हा केक.

मोल्टन लाव्हा केक
साहित्य
१ वाटी मैदा
१.२५ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी लोणी
५ चमचे कोको पूड
३ अंडे
३ अंड्यांचे पिवळे
२ वाटी साखर

कृती
  • रामेकिंसना लोण्याचा हात लावून बाजूला ठेवणे.
  • ओव्हन ४५०F/२३०C वर गरम करणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये लोणी आणि चॉकोचिप्स एकत्र करून १ मिनिट गरम करणे.
  • लोणी आणि चॉकोचिप्स नीट ढवळणे आणि एकजीव करणे आणि बाजूला ठेवणे.
  • अंडी आणि अंड्याचे पिवळे एकत्र फेसून घेणे.
  • त्यात साखर घालुन पांढरे होईपर्यंत पुन्हा फेटणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट - लोणी मिश्रण घालुन पुन्हा फेटणे
  • मैदा आणि कोको पूड चाळून घेणे व वर बनवलेल्या मिश्रणात डाव घालुन हलकेच ढवळून घेणे.
  • बनवलेले मिश्रण ६ रामेकिंसमध्ये घालणे,
  • रामेकिंसना बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ते ओव्हन मध्ये ४५०F/२३०C वर १३ मिनिट भाजणे.
  • ओव्हन मधून लगेच काढून बशीत उलटे करून खायला देणे

टीप
रामेकिंसऎवजी पेपर कप मफीन पॅनमध्ये ठेवून पण भाजू शकतो पण त्यासाठी थोडे उंच पेपर कप वापरणे म्हणजे त्याला धरून केक ला उचलून उलटे करणे सोपे जाईल
केकला उलटे करण्यासाठी रामेकीन एका बशीत ठेवणे व रामेकिंवर एक बशी ठेवणे व दोन्ही बश्याना धरून उलटे करणे. रामेकिंस खूप गरम असल्यानी बश्यांची फार मदत होते.

भोपळा आणि बदामाचा कप केक


थोड्या दिवसांपूर्वी मी खतखते बनवण्यासाठी भोपळा शोधत होते. कुठेच न मिळाल्यानी शेवटी एका ठिकाणचा डब्ब्यातला भोपळा आणलेला. पण तो उघडला तर लक्षात आले की भोपळ्याची पेस्ट आहे आणि मला तुकडे हवे होते. मग थोड्यावेळ शोधल्यावर कप केक बनवता येतील असे लक्षात आले. इथे माझ्या कप केकची कृती देत आहे. केक भाजताना इतका सुंदर वास सुटलेला की कधी एकदा तयार होतो आणि कधी खाते अस झालेलं.

भोपळा आणि बदामाचा कप केक
साहित्य
२ वाटी भोपळ्याची पेस्ट
३ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१.५ वाटी ब्राऊन शुगर
१/२ वाटी पिठी साखर
२ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा बेकिंग सोडा
१/२ वाटी दुध
१/२ चमचा दालचिनी पूड
१/२ चमचा लवंग पूड
१/२ चमचा जायफळ पूड
१/४ वाटी बदामाचे तुकडे
१/२ चमचा पिस्ता इसेन्स
२ अंडी

कृती
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
  • त्यात दालचिनी पूड, लवंग पूड आणि जायफळ पूड घालुन एकत्र करणे.
  • एका भांड्यात लोणी, ब्राऊन शुगर, पिठी साखर एकत्र फेटणे.
  • त्यात एकावेळी एक अंडे घालुन चांगले फेटणे.
  • थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन एकत्र करत सगळे मिश्रण चांगले एकत्र करणे.
  • त्यात दुध घालुन ढवळणे.
  • भोपळ्याची पेस्ट, पिस्ता इसेन्स घालुन ढवळणे.
  • बदामाचे तुकडे थोडे बाजूला ठेवून उरलेले एकत्र करणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • कप केकच्या ट्रेला लोण्याचा हात लावून त्यात ३/४ लेव्हल पर्यंत मिश्रण ओतणे व वरून बद्दल लावणे.
  • ओव्हन मध्ये ३५०F/१८०C वर २० मिनिट भाजणे.

टीप
ताजा भोपळा वापरायचा असेल तर त्याला उकडून मिक्सरमध्ये वाटून घेणे.
साधारण १६ मध्यम आकाराचे कप केक बनतील

चेरी आणि काजूचा कप केक


मफीन बनवल्यापासून मी बरेच दिवस कप केक बनवण्याचा विचार करत होते. आज शेवटी मुहूर्त लागला :) :)

चेरी आणि काजूचा कप केक
साहित्य
२ वाटी टीन मधली चेरी
१ वाटी चेरीचे सिरप
१ वाटी पिठी साखर
२ अंडी
१/२ वाटी लोणी
२ वाटी मैदा
२.२५ चमचा बेकिंग पूड
१/२ वाटी दुध
१/२ वाटी काजू

कृती
  • लोणी, पीठ साखर आणि अंडी एकत्र फेटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे
  • एकावेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालत एकत्र करणे.
  • चेरीच्या बिया काढून त्या, त्यांचे सिरप, काजू आणि दुध पिठात घालुन हलके एकत्र करणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • कप केपच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात २/३ काटापर्यंत मिश्रण भरणे
  • ओव्हनमध्ये २००C वर २० मिनिट केक भाजणे.

टीप
चेरी सिरप आणि थोडेसे वाटले गेलेले चेरी एकत्र मिळून एकदम चांगली चव देतात.
ह्यात बदाम आणि अक्रोडपण वापरता येतील पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी नाही वापरले
मी खारट मीठ वापराल्यानी वेगळे मीठ मैद्यात घातले नाही पण जर मीथाविना लोणी वापरले तर मैद्यात मीठ घालायला विसरू नये.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP