चॉकलेट कपकेक
एकादिवशी असच काहीतरी बेकिंग करायचा म्हणून केलेला हा प्रयोग. बरेच दिवसांपासून फ्रीजमध्ये असलेल्या बटर आयसिंगचा एकदम मस्त उपयोग आणि ते केक बरोबर एकदम छान लागले
साहित्य
2 वाटी साखर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स
१ अंडे
१/२ वाटी तेल
१ वाटी दुध
१.७५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
१ चमचा बेकिंग पूड
१ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा मीठ
२ चमचे इन्स्टण्ट कॉफी
कृती
- ओव्हन 3२५F/१६०C वर गरम करणे
- अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटणे
- त्यात तेल आणि दुध घालून मध्यम वेगात मिश्रण फेटून घेणे
- मैदा, कोको पूड, बेकिंग पूड आणि बेकिंग सोडा २-३ वेळा चाळून घेणे
- चाळलेले पीठ अंडी-तेल-दुधाच्या मिश्रणात घालून २ मिनिट कमी वेगावर फेटणे
- १ वाटी पाणी आणि कॉफी एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट गरम करणे
- कॉफी केकच्या मिश्रणात घालून मध्यम वेगात २ मिनिट फेटणे
- कपकेकच्या भांड्यात १४ लायनर घालून त्यात ३/४ पातळीपर्यंत भरणे
- ओव्हनमध्ये १८ मिनिट भाजणे.
- केक कमीत कमी १ तास थंड होऊ देणे मग केकवर फ्रॉसटिंग आणि फिलिंग घालून केक खायला देणे
टीप
मी फिलिंग नाही वापरले पण चॉकलेट गनाश एकदम चांगले जाइल
मी आधी बनवलेले चॉकलेट बटरक्रीम फ्रॉसटिंगसाठी वापरले
0 comments:
Post a Comment