टोमाटो कॉर्न ऑमलेट
हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आणि चविष्ठ आहे. आई फक्त टोमाटो ऑमलेट करायची पाणी मी थोडासा बदलून हा कॉर्न वाला केलाय.
साहित्य
४ टोमाटो
१ वाटी कॉर्न
१ वाटी बेसन
१ चमचा तांदुळाचे पीठ
१/२ चमचा लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल
कृती
- बेसन, तांदुळाचे पीठ आणि मीठ एकत्र करणे.
- जीरा थोडासा कुटून घेणे व बेसनमध्ये एकत्र करणे.
- मिक्सरमध्ये टोमाटो, अर्धा वाटी कॉर्न, हिरव्या मिरच्या आणि लसुणाची पेस्ट घालुन एकत्र वाटणे.
- हे मिश्रण बेसनमध्ये घालुन चांगले ढवळून घेणे. लागल्यास थोडे पाणी घालावे.
- उरलेला कॉर्न घालुन मिश्रण ढवळून घेणे.
- तवा गरम करून त्यावर टोमाटो मिश्रण घालुन घावन काढावे.
- तव्यावर दोन्ही बाजूनी कुरकुरीत भाजून घेणे. चटणी किंवा सॉस बरोबर खायला देणे.
टीप
ह्यात १-२ चमचे कोथिंबीर बारीक चिरून घालता येईल पण मी कोथिंबीरच्या चटणी बरोबर डोसे खायला दिले त्यामुळे कोथिंबीर डोश्यात घातली नाही.
0 comments:
Post a Comment