पुदिना चटणी
तंदुरी चिकनबरोबर वाढली जाणारी पुदिन्याची चटणी मला फार आवडते. हा माझा प्रयोग आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला.
साहित्य
१ वाटी पुदिना
२ चमचे कोथिंबीर
२ वाटी दही
मीठ
कृती
- पुदिना आणि कोथिंबीर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणे
- वाटलेला पुदिना गाळून त्याचे पाणी घ्यावे.
- एका भांड्यात दही, मीठ आणि गाळलेले पाणी एकत्र करणे.
टीप
दही एकदम घट्ट वापरावे कारण पुदिन्याचे पाणी मिसळल्यावर चटणी पातळ होते.
0 comments:
Post a Comment