अंड्याविना चॉकलेट केक
अतुलच्या आईनी साधारण ६ महिन्यापूर्वी अंडी नसलेला केक बनवायला सांगितलेला. प्रत्येकवेळी काहीतरी कारणांनी ते राहूनच जायचं. आज जेंव्हा आम्ही त्यांच्याघरी नाष्ट्याला जाणार आहोत तेंव्हा मला वाटला हा केक घेऊन जाणे उत्तम ठरेल. केक एकदम मस्त मऊ आणि फुलून आला. मला अस वाटतंय की मला अंडे घातलेल्या ह्या चॉकलेट केकपेक्षा किंवा ह्या वाढदिवसाच्या चॉकलेट केकपेक्षा आजचा हा केक फार आवडला.
साहित्य
४.५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
३ वाटी साखर
१ वाटी तेल
१ चमचा बेकिंग सोडा
२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१ चमचा मीठ
कृती
- ओव्हन ३५०F/१५०C वर गरम करणे.
- मैदा आणि कोको पूड एकत्र चाळून एका भांड्यात घेणे.
- त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घालुन एकत्र करणे.
- दुसऱ्या भांड्यात तेल, ३ वाटी पाणी आणि व्हॅनिला ईसेन्स एकत्र फेटून घेणे.
- त्यात साखर घालुन पुन्हा फेटणे.
- मैदा आणि कोको पूडचे मिश्रण चाळत तेलाच्या मिश्रणात घालणे व फेटून घेणे.
- केक भाजायच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात केकचे मिश्रण ओतणे.
- केक ३५०F/१७५C वर एकूण ५० मिनिट भाजणे, भाजताना ३५ मिनिट झाल्यावर पुढची बाजू मागे जाईल अस फिरवणे.
टीप
मी केकवर चॉकलेट गनाश ओतून पांढऱ्या चॉकलेट क्रीम चीजच्या आईसिंगनी सजवले.
जर गनाशच्या वर आईसिंगनी सजवायचे असेल तर गनाश साधारण ३-४ तास सेट होऊ देणे म्हणजे आईसिंगची सजावट घसरणार नाही. मी वाट न बघता लगेच आईसिंग करायला घेतले त्यामुळे मला फार त्रास झाला.
0 comments:
Post a Comment