चॉकलेट केक
ह्या आठवड्यात मला २ केक बनवायचे होते. एक फॉनडन्टच्या क्लाससाठी आणि एक फुलांच्या क्लाससाठी. हा केक मी फुलांनी सजवण्यासाठी बनवला. मला तो पांढऱ्या फुलांनी सजवायचा होता पण माझा आईसिंग जरा खराब झाल, मग मी हा केक महिनाभर क्लासमध्ये शिकताना बनवलेल्या फुलांनी सजवला. इथे हि सोपी केकची पाककृती देत आहे.
साहित्य
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ चमचा कोको पूड
१ स्पून बेकिंग पूड
३ अंडी
कृती
- ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
- मैदा, कोको पूड आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
- त्यात लोणी वितळवून, साखर आणि अंडी घालुन चांगले फेटून घेणे.
- केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
- केक ३२५F/१६०C वर भाजणे
- ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे
टीप
मी हा केक दोनवेळा आयताकृती भांड्यात बनवला. दोन केकच्यामध्ये चॉकलेट वितळवून घालुन तो जोडला व उंच बनवला. त्यावर चॉकलेटचे बटर आईसिंग आणि रॉयल आईसिंगची फुलं लावून सजवला.
0 comments:
Post a Comment