कॉर्न भजी
थोडी वेगळी भजी करण्याचा हा प्रयत्न. छान झालेली भजी एकदम
साहित्य
३ वाटी कॉर्न
१/४ चमचा आले पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा तिखट
४ चमचे बेसन
१/४ चमचा धने पूड
१ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल
कृती
- २.५ वाटी कॉर्न, आले पेस्ट आणि हिरव्या मिरच्या जाडसर वाटणे.
- त्यात उरलेले कॉर्न, तिखट, धने पूड, आमचूर पूड, बेसन आणि मीठ एकत्र करणे.
- १ चमचा गरम तेल घालुन जाडसर पीठ बनवणे
- मिश्रणाचे गोळे बनवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.
टीप
कॉर्न गोड असल्यानी त्याला आले, हिरव्या मिरच्या आणी तिखट चांगली साथ देतात
ह्यात ३-४ चमचे कोथिंबीर पण घालता येईल
0 comments:
Post a Comment