Aug 2008
08
पनीर टिक्का
ह्या आठवयात मी अन्घेठीमध्ये गेलेले तेंव्हा तिथे कबाब बनवताना पहिले. ते बघून मला पण कबाब बनवण्याची फार इच्छा झाली त्यामुळे बाजारात जाऊन पनीर घेऊन आले आणि कबाब बनवले.

साहित्य
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
१ ढोबळी मिरची
१/२ वाटी दही
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा जीरा पूड
१ चमचा चाट मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
मीठ
लोणी
कृती
- पनीर चौकोनी चिरणे.
- दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, जीरा पूड, चाट मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करून पनीर बरोबर एकत्र करणे व २ तास फ्रीजमध्ये ठेवणे.
- टोमाटो आणि ढोबळी मिरचीचे चकत्या करणे त्यावर मीठ आणि थोडा चाट मसाला एकत्र करणे.
- टिक्का बनवण्याच्या दांडीवर टोमाटो, ढोबळी मिरची आणि पनीर लावणे.
- लोणी वितळवून टिक्यावर ओतणे व त्याला ३० मिनिट गुलाबी रंगावर ग्रील करणे.
टीप
ग्रील केलेले पनीर चांगले लागते पण मी कुठेतरी पनीर तळून काठीला लावलेले वाचणे. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्यांना हा पर्याय आहे.
आमच्या खालच्या काकू मातीच्या भांड्यात कोळसा घालुन त्यावर कबाब भाजतात.
0 comments:
Post a Comment