Aug 2008
04
कांद्याची खेकडा भजी
आज खूप जोरात पाऊस पडत होता आणि गरम गरम भजी खाण्याची इच्चा मी आवरू नाही शकले. पण जो पर्यंत भजी तयार झाली तोपर्यंत पाउस बंद झालेला :(

साहित्य
२ कांदे
४ चमचे बेसन
५ चमचे कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल
कृती
- कांदा बारीक उभा चिरणे व त्याला मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवणे.
- ५-१० मिनिटांनी त्याला पाणी सुटेल, त्यात बेसन, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पूड आणि चमचाभर गरम तेल घालुन एकत्र करणे व भजीचे पीठ भिजवणे. लागल्यास पाणी वापरणे.
- तेल गरम करून त्यात छोटे छोटे भजी गुलाबी होईपर्यंत तळणे.
टीप
ह्यांना खेकडा भजी म्हणतात ते त्यांच्या आकारामुळे.
मीठ आधी लावून ठेवल्यानी नंतर त्याचे पाणी सुटून पीठ पातळ होत नाही
0 comments:
Post a Comment