Aug 2008
18
खारे शेंगदाणे
अगदी लहान असल्यापासून आम्ही हे घरी बनवायचो आणि शनिवार, रविवारचे पिचर बघताना खायचो. तेंव्हा स्वयंपाकातील फार माहिती नसल्यानी बऱ्याच वेळा शेंगदाणे मऊ व्हायचे. हळू हळू हे बनवण्याचे कमी झाले, पण मागच्या आठवड्यात मी माझ्या नवीन स्वयंपाकाच्या माहितीवरून प्रयत्न करायचा ठरवला आणि ते एकदम मस्त झालेले.

साहित्य
२ वाटी शेंगदाणे
२ चमचा मीठ
कृती
- शेंगदाणे पूर्ण होईपर्यंत भाजून घेणे.
- शेंगदाणे शेंगदाणे घालुन त्यावर वाटीभर पाण्यात मीठ घालुन ते ओतावे.
- जास्तीचे पाणी काढून टाकणे.
- लगेच शेंगदाणे कढईत घालुन जोरात आचेवर सारखे हलवत पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
टीप
खारट पाणी शेंगदाण्यावर पटकन ओतणे महत्वाचे आहे म्हणजे शेंगदाणे पाणी शोषून घेणार नाहीत.
0 comments:
Post a Comment