खजूर आणि अक्रोडचा केक
ह्या वीकेंडला सीमा इथे होती आणि तिच्या आणि तिच्या सासरच्यासाठी मी हा केक बनवला. इतका सुंदर झालेला की तो लगेचच संपूनपण गेला
साहित्य
२ वाटी बिन बियांचे खजूर
१ वाटी अक्रोड
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
२ अंडी
१/४ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा खाण्याचा सोडा
कृती
- खजूर धुवून त्यांचे छोटे तुकडे करणे व त्यात अक्रोडचे तुकडे, १/४ चमचा बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि ४ चमचे पाणी घालुन एकत्र करणे व रात्रभर भिजत ठेवणे.
- दुसऱ्या दिवशी सकाळी लोणी आणि साखर एकत्र फेटणे.
- दुसऱ्या भांड्यात अंडे फेटणे.
- लोणी साखरेच्या मिश्रणात थोडे थोडे अंडे, थोडा मैदा आणि थोडे खजूर-अक्रोड मिश्रण एकत्र करत एकत्र करणे.
- उरलेली १/४ चमचा बेकिंग पूड आणि लिंबाचा रस चमच्यात एकत्र करणे व केकच्या मिश्रणात घालणे.
- ओव्हन २००C वर गरम करणे.
- केक भाजायच्या भाण्याला लोण्याचा हात लावून त्यावर बटर पेपर लावणे. त्यात केकचे मिश्रण ओतणे.
- केक मायक्रोवेव्ह आणि कनव्हेक्शन मोडमध्ये १८०W आणि १८०C वर ३० मिनिट भाजणे.
टीप
जर केकचे मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात ३-४ चमचे कोमट पाणी घालणे.
0 comments:
Post a Comment