चेरी केक
अजॉयला हा केक मी बनवून पाठवला. जवळ जवळ २ महिने त्यावर प्रयोग करायला न मिळाल्यानी हा केक बनवताना एक वेगळीच उत्सुकता होती :)
साहित्य
१/२ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ वाटी मैदा
१/२ बेकिंग पूड
१/२ वाटी गोड चेरी
१/२ चमचा आईसिंग शुगर
१ अंडे
कृती
- चेरी धुवून त्याचे शुगर पाक निघेपर्यंत धुणे व कपड्यांनी पुसून घेणे. त्यावर १/२ चमचा मैदा शिंपडून बाजूला ठेवणे.
- लोणी आणि साखर एकत्र फेटणे.
- मैदा आणि बेकिंग पूड ४-५ वेळा चाळणे
- अंडे फेटणे.
- लोणी साखरेच्या मिश्रणात मैदा आणि अंडे थोडे थोडे करत एकत्र करणे.
- त्यात चेरी अलगद एकत्र करणे.
- केकचे भांडे लोणी लावून त्यावर बटर पेपर लावून तयार करणे. त्यात केकचे मिश्रण ओतणे.
- ओव्हन २००C वर गरम करणे.
- मायक्रोवेव्ह आणि कनव्हेक्शन मोड मध्ये १८०W आणि १८०C वर १५ मिनिट केक भाजणे.
- केक १० मिनिट थंड झाल्यावर त्यावर आईसिंग शुगर शिंपडणे व पूर्ण थंड झाल्यावर तुकडे करणे.
टीप
केकचे मिश्रण घट्ट असल्यास त्यात कोमट पाणी घालुन पातळ करणे.
0 comments:
Post a Comment