साधा डोसा
मला नेहमीच कुरकुरीत पातळ साधा डोसा बनवण्याची इच्छा होती. बऱ्याच ठिकाणी वाचल्यावर मी हा डोसा बनवला तो इतका छान झालेला की मी ५ डोसे खाले
साहित्य
३ वाटी इडली रवा
१ वाटी उडीद डाळ
१/२ वाटी मुंग डाळ
१/२ वाटी तूर डाळ
१ चाचा मेथी बिया
१/४ वाटी तेल
मीठ
तूप
कृती
- इडली रवा, उडीद डाळ, मुंग डाळ, तूर डाळ आणि मिठी बिया वेगवेगळ्या ८ तास भिजवणे.
- मेथो सोडून सगळ्यातले पाणी काढणे.
- मेथी बिया आणि उडीद डाळ एकत्र बारीक वाटणे.
- इडली रवा, मुंग डाळ आणि तूर डाळ वेग वेगळे वाटणे.
- सगळे वाटण एकत्र करणे व गरम जागी रात्रभर भिजण्यासाठी ठेवणे.
- सकाळी पिठात मीठ आणि तेल एकत्र करणे.
- तवा गरम करून मंद आचेवर मिठाचे पाणी आणि तेल शिंपडून कपड्यांनी तवा पुसून घेणे.
- त्यावर १/४ वाटी डोस्याचे मिश्रण तव्यावर ओतणे.
- पटकन वाटी मिठाच्या पाण्यात भिजवून त्यानी डोसा गोल गोल फिरवत बाहेर पसरवून पातळ करणे.
- सर्व बाजूनी तूप सोडून मंद आचेवर भाजणे व चटणी किंवा/आणि सांबारबरोबर खायला देणे.
टीप
डोसा कुरकुरीत आणि पातळ होण्यासाठी पीठ बारीक वाटणे व चांगले आंबवणे महत्वाचे आहे. पीठ नीट आंबवण्यासाठीची टीप इथे: आप्पे कृतीबरोबर दिलेय.
डोसा पातळ करताना वाटी पिठात थोडी दाबून फिरवायची.
0 comments:
Post a Comment